डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवर झाडे लावण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:37+5:302021-04-25T04:13:37+5:30
नांदगाव : कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी आपत्कालिन परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर संजीवनी ...
नांदगाव : कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी आपत्कालिन परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठीवर चक्क पर्यावरणातील ऑक्सिजन वाढविण्याचा उपचार दिला आहे.
‘आजारातून बरे झाल्यानंतर एक झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजनची कमी पडणार नाही’, असे औषधांच्या नावाखालीच लिहून दिल्याने निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाला बळ तर मिळालेच आहे. परंतु, कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेला मानवनिर्मित ऑक्सिजन सध्या दुर्मीळ झाला आहे. त्याचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न एकीकडे सुरु झाले आहेत, याकडेही लक्ष वेधले गेले आहे. निसर्गातल्या ऑक्सिजन निर्मितीकडेसुद्धा लक्ष द्यायला हवे, याची आठवण करून देणाऱ्या औषधाच्या चिठ्ठीतल्या संदेशाचे नागरिक कौतुक करत आहेत.
फोटो : २४ नांदगाव मेडिसिन
===Photopath===
240421\24nsk_21_24042021_13.jpg
===Caption===
फोटो : २४ नांदगाव मेडिसिन