‘स्वच्छ भारत’ अभियानात पोस्टकार्डद्वारा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:33 AM2018-10-20T00:33:47+5:302018-10-20T00:34:16+5:30
विश्वकर्मा महिला मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभिनव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य व स्वच्छ भारतबाबत जनजगृती व्हावी यासाठी पोस्ट कार्डच्या मदतीने संदेश देण्याचा जागतिक दर्जाची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हेमा सोमवंशी, वैशाली नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंचवटी : विश्वकर्मा महिला मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभिनव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य व स्वच्छ भारतबाबत जनजगृती व्हावी यासाठी पोस्ट कार्डच्या मदतीने संदेश देण्याचा जागतिक दर्जाची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हेमा सोमवंशी, वैशाली नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेऊन सॅनिटरी पॅड निर्मितीची यंत्रणा लोकार्पण आणि स्वच्छता या मुद्द्यांवर आधारित नवीन वर्षात सुमारे २० हजार स्वच्छता संदेश पोस्ट कार्डच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयात पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. स्वच्छता संदेश देणारे जागतिक दर्जाचे रेकॉर्ड २० हजार नोंदणीसाठी २० महिलांनी प्रयत्न केले आहे, असेही त्यांनी सांगितले. सॅनिटरी पॅड अल्पदरात महिलांना उपलब्ध केले जाणार आहेत.