शुभकार्यातून सामाजिक कार्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 04:17 PM2019-06-11T16:17:57+5:302019-06-11T16:18:13+5:30
विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्चाला फाटा
घोटी : तरु ण पिढीमध्ये येत चाललेले सामाजिक भान हे बदलत्या काळात सुचिन्ह मानले जात आहे. नाशिकमधील एका विवाह सोहळ्यात वधू-वराकडील परिवाराने मानपान व अहेराच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत त्याची रक्कम सामाजिक कार्यासाठी देत समाजाला संदेश दिला आहे.
मते-गाढवे परिवारातील सोनाली आणि श्रीधर हे नाशिक येथे विवाह बंधनात अडकले. विवाह सोहळ्यात होणारा मानापानाचा व अहेराच्या होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालून या नवदांपत्याने आदर्श घालून दिला. लग्न मंडपातच गावच्या शाळेला व भजनी मंडळाला साहित्य घेण्यासाठी धनादेश सुपुर्द केला. गावच्या माध्यमिक विद्यालयासाठी ३५ हजार रु पये तसेच भजनी मंडळींना साहित्य घेण्यासाठी १५ हजार रु पयेदिले. परिवाराच्या या निर्णयाचे उपस्थित पाहुणे मंडळींनी व परिवाराने कौतुक केले. मदतीचा धनादेश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गं. पां. माने, मुख्याध्यापक एस.डी. अहिरे यांनी स्वीकारला.