म.गांधी प्रत्येक पिढीला समकालीनच : मुकुंद दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:10 AM2019-05-11T00:10:20+5:302019-05-11T00:10:36+5:30
महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले.
नाशिक : महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले.
गोदाकाठावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. १०) सुरेश मेणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहावे पुष्प गुंफताना त्यांनी ‘महात्मा गांधी विचारांची आजच्या काळात उपयुक्तता’ विषयावर व्याख्यान दिले. मुकुंद दीक्षित म्हणाले, गांधींजींची पूजा करणारे अनेक लोक होते; परंतु त्यांची पूजा करणे महत्त्वाचे नाही तर त्यांचा विचार घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. प्रत्येक माणूस आपली एक क्षमता घेऊन जन्माला येतो, गांधीजी त्यापैकीच एक होते. गांधी ही चांगली गोष्ट आहे परंतु ते माणूस होते हे कबूल करायला हवे त्यासाठी मोठेपणा लागतो. रोजच्या जीवनात माणसाला आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान ठरवावे लागते तसे गांधीजींनी ते त्यांच्या जीवनात ठरविलेले होते. शिक्षणामुळे जीवनाला दिशा मिळते, म्हणूनच प्रत्येकाला त्याच्या जीवनाला दिशा देणारे शिक्षण मिळायला हवे आणि हे शिक्षण मातृभाषेतून मिळावे यासाठी महात्मा गांधी आग्रही असल्याचेही दीक्षित यांनी नमूद केले. व्यासपीठावर शोभना मेणे, सत्यजित मेणे, जुई मेणे यांची उपस्थिती होती. सुरेश मेणे यांच्या स्मृतींना सुभाष सबनीस यांनी उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय सचिन मालेगावकर यांनी करून दिला़
आजचे व्याख्यान , वक्ते : श्रीकांत कोतूरवार, विषय : सत्संग (भक्तिगीत)