एमजीव्ही, पवार फार्मसीला संयुक्त विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:40 AM2019-01-22T01:40:19+5:302019-01-22T01:40:35+5:30

नॅशनल फार्मसी वीक २०१९ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पदवी गटातून यंदा एमजीव्हीचे पंचवटीतील फार्मसी कॉलेज व जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले.

 MGV, Pawar Pharmacy, joint championship | एमजीव्ही, पवार फार्मसीला संयुक्त विजेतेपद

एमजीव्ही, पवार फार्मसीला संयुक्त विजेतेपद

Next

नाशिक : नॅशनल फार्मसी वीक २०१९ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पदवी गटातून यंदा एमजीव्हीचे पंचवटीतील फार्मसी कॉलेज व जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले. तर पदविका महाविद्यालयांच्या गटातून एशियन इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी या महाविद्यालयाने यंदाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनची नाशिक शाखा व जिल्ह्यातील ३३ फार्मसी महाविद्यालये यांच्यातर्फे औषध निर्माणशास्त्र सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांनाना सोमवारी (दि.२१) दादासाहेब गायकवाड सभागृहातील दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, औषधनिर्मिती उद्योजक भरत मेहता, आयपीएचे नाशिकचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप डेर्ले आदी उपस्थित होते. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या फार्मसी वीकमध्ये पदवी गटात भुजबळ नॉलेज सिटी संचलित फार्मसी कॉलेज व पदविका विभागात मविप्रच्या आडगाव येथील डी. फार्मसी महाविद्यालयाने उपविजेता किताब पटकावला.
सप्ताहानिमित्त झालेल्या विविध २८ स्पर्धांत सुमारे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांपैकी एक ते दीड हजार विजेत्या विद्यार्थ्यांना विविध गटांतून पारितोषिके देण्यात आली. जिल्हाभरातील ३३ फार्मसी महाविद्यालयांत आयपीए नाशिक शाखेतर्फे यंदा फार्मासिस्ट फॉर हेल्दी इंडिया या संकल्पनेवर आधारित फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
यावेळी आयपीएचे सचिव डॉ. मिलिंद वाघ, डॉ. यू. व्ही. उशीर, एस. व्ही. अमृतकर, पी. जी. मोराणकर, डी. के. पाटील, ए. डी. मारु, डॉ. जी. एन. चौधरी आदींसह औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.
औषधांविषयी जनजागृतीची गरज
४फार्मसी वीकच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना देवयांनी फरांदे यांनी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये औषधांविषयी जागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच निश्चित प्रमाणापेक्षा अतिरिक्त अथवा कमी प्रमाणात औषधाचा डोस घेतल्याने लाखो नागरिकांचा मृत्यू होत आहे. हा विषय विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घेऊन नागरिकांमध्ये औषध वापराविषयी जागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title:  MGV, Pawar Pharmacy, joint championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक