म्हसरूळला गोळीबाराची अफवा आणि यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:44 AM2017-12-09T00:44:59+5:302017-12-09T00:45:40+5:30

पंचवटी / नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयिताचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असून, गोळीबाराची अफवा असल्याचा खुलासा केला आहे.

Mhasrul shot fierce rumors and system rush | म्हसरूळला गोळीबाराची अफवा आणि यंत्रणेची धावपळ

म्हसरूळला गोळीबाराची अफवा आणि यंत्रणेची धावपळ

googlenewsNext

पंचवटी / नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयिताचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असून, गोळीबाराची अफवा असल्याचा खुलासा केला आहे.  गणेशनगर येथील भूषण पगारे याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संशयित विराज पारधी व त्याचा साथीदार यांनी दुपारी दुकानात येऊन काच फोडून नुकसान केल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ शिवारातील कलानगरमध्ये काही महिन्यांपूर्वी सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती़ या घटनेतील एक संशयित गणेशनगरमध्ये राहत असून, खुनाचा बदला घेण्यासाठी दुपारी पारधी आपल्या साथीदारासह आला होता़ दरम्यान, या घटनेनंतर म्हसरूळमध्ये गोळीबार झाल्याची चर्चा पसरल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र शार्दुल, उपनिरीक्षक संजय पवार, संजय राऊत व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर गोळीबाराची अफवा असल्याचे सांगितले. 
संशयित मोरे गॅँगचे हस्तक 
दुकानातील काच फोडणारे संशयित हे मयत सराईत गुन्हेगार निखिल ऊर्फ बाल्या मोरे याचे हस्तक असल्याची चर्चा आहे़ काही महिन्यांपूर्वी सराईत गुन्हेगार मोरेचा पाच ते सहा संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दिंडोरीरोडवरील कलानगर परिसरात घडली होती. या खून प्रकरणातील संशयित रोशन पगारे हा गणेशनगर परिसरातील असून, शुक्रवारी (दि़ ८) दुपारी दोघा संशयितांनी त्याच्या दुकानात जाऊन काच फोडून वचपा काढण्याचा प्रयत्न केला. संशयित मोरेचे हस्तक असल्याची माहिती एका पोलीस कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली़

Web Title: Mhasrul shot fierce rumors and system rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.