म्हसरूळला जैन तीर्थंकर पादुकांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:50 AM2018-11-12T00:50:51+5:302018-11-12T00:51:08+5:30
श्री दिगंबर जैन पंथाचे प्रसिद्ध असलेले सिद्धक्षेत्र गजपंथ येथे २४ तीर्थंकर चरण पादुकांचे भूमिपूजन पूज्य मुनिश्री विकसंतसागरजी यांच्या सान्निध्यात संपन्न झाले.
म्हसरूळ : श्री दिगंबर जैन पंथाचे प्रसिद्ध असलेले सिद्धक्षेत्र गजपंथ येथे २४ तीर्थंकर चरण पादुकांचे भूमिपूजन पूज्य मुनिश्री विकसंतसागरजी यांच्या सान्निध्यात संपन्न झाले.
श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ ट्रस्ट यांच्या अखत्यारीत असलेल्या म्हसरूळ येथील जागेवर सदर भूमिपूजन संपन्न झाले. जैन धर्मामध्ये २४ तीर्थंकर मानले जातात. त्यांच्या चरण पादुका येथे उभारण्यात येणार आहेत. या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एक फेरीमार्गही तयार करण्यात येणार आहे. भूमिपूजन संस्थेचे सहसचिव रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूज्य मुनिश्री विकसंतसागरजी महाराज यांनी मंगल पाठद्वारे विधी केला. यावेळी मुनिश्री अध्ययनसागरजी, मुनिश्री आवशकसागरजी, आर्यिका समिधीमती माताजी, आर्यिका सुनंदामती माताजी, क्षुल्लिका सुलोचनामती माताजी उपस्थित होत्या.