चुंचाळे परिसरात पोलिसांचे मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:37 PM2019-03-19T22:37:55+5:302019-03-20T01:05:20+5:30
अंबड पोलीस व युनिट गुन्हे शाखेने शनिवारी रात्रीच्या सुमारास अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेत अचानक कोम्बिंग आॅपरेशन करीत ३० टवाळखोरांसह रेकॉर्डवरील १७ गुन्हेगारांची तपासणी करताना तिघा गुन्हेगारांवरही कारवाई केली.
सिडको : अंबड पोलीस व युनिट गुन्हे शाखेने शनिवारी रात्रीच्या सुमारास अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेत अचानक कोम्बिंग आॅपरेशन करीत ३० टवाळखोरांसह रेकॉर्डवरील १७ गुन्हेगारांची तपासणी करताना तिघा गुन्हेगारांवरही कारवाई केली.
पोलिसांनी रात्री १२ वाजेच्या सुमारास कोम्बिंग आॅपरेशनला सुरुवात केली. दुचाकी वाहनांच्या कागदपत्र तपासणीच्या बहाण्याने चौकशी सुरू केली त्यामुळे संपूर्ण घरकुल रहिवासी जागे झाले. त्यांच्याकडील वाहनांचे कागदपत्रे तपासली. यावेळी चार ते पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.
कारवाईचे स्वागत
चुंचाळे परिसरात झालेल्या कारवाईविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही कारवाही कितपत योग्य आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे? याठिकाणी गरीब व कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती असून, यातील काही नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागतही केले असून अशीच मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.