नाशकात मध्यरात्री तुफान पाऊस, अवघ्या तीन तासातच 55.6 मिमीची नोंद
By संजय पाठक | Published: September 1, 2022 09:23 AM2022-09-01T09:23:33+5:302022-09-01T09:23:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये निरभ्र वातावरण असले तरी काल गणरायाच्या आगमना बरोबरच पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये निरभ्र वातावरण असले तरी काल गणरायाच्या आगमना बरोबरच पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. काल सायंकाळी आणि रात्री सुमारे तासभर पाऊस झाला मात्र रात्री साडेअकरा ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत तुफान पावसाने शहराला झोपून काढलं वेधशाळेच्या माहितीनुसार साडेअकरा ते अडीच या वेळेत 55.6 मिलिमीटर इतका तुफान पाऊस झाला तर मध्यरात्री अडीच ते पहाटे साडे पाच वाजेपर्यंत 11.6 मी मी पावसाची नोंद झाली.
सोमवारी दुपारीही तासाभरात 28 मिमी पाऊस झाला होता. मात्र काल रात्री जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहनचालकांना रस्ते दिसत नव्हते. अवघ्या अर्ध्या तासात रस्ते जलमय झाले होते तसेच चौकाचौकात तळे साचले होते. अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता.