पराक्रमी टी ५५ रणगाडा लेखानगरला विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:44+5:302021-03-25T04:15:44+5:30

भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची महती सर्वसामान्य जनतेला कळावी आणि तरुणानांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी शिवसेना नगरसेवक प्रवीण ...

Mighty T55 Rangada enthroned at Lekhanagar | पराक्रमी टी ५५ रणगाडा लेखानगरला विराजमान

पराक्रमी टी ५५ रणगाडा लेखानगरला विराजमान

Next

भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची महती सर्वसामान्य जनतेला कळावी आणि तरुणानांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केंद्रस्तरावर पाठपुरावा करून सैन्य दलात ४० वर्षे सेवा बजावलेला टी ५५ हा बहुचर्चित रणगाडा मंजूर करून आणला. लेखानगर येथील नाशिक महापालिकेच्या मोकळ्या जागेवर हा रणगाडा बुधवारी बसविण्यात आला. १९६० ते १९८० या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्याने पाकिस्तानी सैन्य दलात दहशत निर्माण केली होती. टी ५५ या रणगाड्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ५८ रणगाडे नष्ट केले होते. नाशिकच्या वैभवात भर घालणारा हा रणगाडा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे. लष्कराच्या तोफखाना विभागाचे लेखानगर येथे वित्त विभागाचे कार्यालय आहे आणि लेखानगर हे जुने सिडकोचे प्रवेशद्वार असल्याने हा टी ५५ रणगाडा लेखानगर येथे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या रणगाड्यासाठी महापालिकेच्या वतीने काँक्रीटचा भव्य चबुतरा उभारण्यात आला आहे. बुधवारी हा रणगाडा मोठ्या क्रेनच्या साह्याने चबुतऱ्यावर बसविण्यात आला.

(फोटो २४ रणगाडा)

Web Title: Mighty T55 Rangada enthroned at Lekhanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.