३५ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:59 PM2019-08-06T22:59:38+5:302019-08-06T23:08:45+5:30

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.

Migrating families | ३५ कुटुंबांचे स्थलांतर

३५ कुटुंबांचे स्थलांतर

googlenewsNext
ठळक मुद्देकसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराने शेतीसह दात्याणेत पूल, रस्ता गेला वाहून

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.
कसबे व मौजे सुकेणेसह बाणगंगा काठच्या दीक्षी, दात्याणे, काटवन, थेरगाव, ओणे या गावांना बाणगंगेच्या महापुराचा तडाखा बसला आहे. कसबे सुकेणे येथील पूररेषेतील जोशीवाडा, भिलाटी येथील जवळपास ३५ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. या पूरग्रस्तांना दाऊदशहावली बाबा मंदिर व दशक्रिया विधी शेडमध्ये निवास व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते रतन शेवकर, तलाठी कार्यालय व ग्रामपालिकेने पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सोमवारी कसबे सुकेणे येथील पूररेषेअंतर्गत येणाºया नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर कसबे सुकेणेच्या तलाठी श्रीमती के.एम. पवार, सचिन कुलथे, रेशन दुकानदार अनिल नळे, ग्रामदक्षता दलाचे सचिन कुलथे, परेश भार्गवे, अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा पडोळ, स्वाती आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी शांताराम धुळे, जगन्नाथ जाधव, मेघनाथ हिरे आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिरासमोरील हॉटेल व टपºया, दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्याचे नव्याने केलेले डांबरीकरण वाहून गेले असून, सर्वत्र गाळ साचला आहे.जिल्हा प्रशासन फिरकलेच नाहीरविवारच्या पूरस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासन केवळ चांदोरी-सायखेड्यात तळ ठोकून होते. कसबे-सुकेणे येथील व परिसरात एकही वरिष्ठ अधिकारी किंवा आपत्ती निवारण पथक फिरकले नसल्याची माहिती पूरग्रस्तांनी दिली. महापूर म्हणजे केवळ सायखेडा, चांदोरी अशी धारणा जिल्हा प्रशासनाची झाली आहे. रविवारी सुकेणेसह तालुक्यातील विविध गावांचा संपर्क तुटला होता. चाटोरी, गोंडेगाव, शिरसगाव, शिंगवे, करंजगाव या गावात प्रशासन पोहोचले नसल्याचा आरोप होत आहे. केवळ चांदोरी बोटीमधून फिरून फोटोसेशन करून तालुक्याच्या पूरस्थितीचा अंदाज घेणाºया मंत्री, अधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. शेती गेली वाहून...
मौजे सुकेणे येथील स्मशानभूमी- जवळील दिलीप माधवराव मोगल यांची सुमारे पाच गुंठे शेती बाणगंगेच्या पुरात पिकासह वाहून गेली आहे. शिवारातील द्राक्ष, टमाटा, फ्लॉवर, सोयाबीन पिके अजूनही पाण्याखाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.दात्याणे पूल
गेला वाहून
दात्याणे गावातील गुरगुडे-पवार-धनवटे वस्तीला व खेरवाडी शिवाराला जोडणारा मुख्य पूल बाणगंगा महापुरात वाहून गेला असून, या भागाचा संपर्क तुटला आहे.

Web Title: Migrating families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस