उमराणे येथील आठवडे बाजाराचे स्थलांतर स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:11 AM2017-11-11T00:11:53+5:302017-11-11T00:12:43+5:30

येथील आठवडे बाजार नूतन जागेत स्तलांतरित करण्यात आला असून, परसूल नदीकाठावरील आमराई येथे हा आठवडे भरविण्यात येत आहे. स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ सरपंच सोनाली देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ व पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते येथील खंडेराव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.

Migrating Weeks in Umraane Launch of Migratory Weekly Market | उमराणे येथील आठवडे बाजाराचे स्थलांतर स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ

उमराणे येथील आठवडे बाजाराचे स्थलांतर स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देयुती शासनाच्या काळात रुग्णालय मंजूर बाजारासाठी जागेची अडचण ट्रॅक्टरच्या साहाय्याने सपाटीकरण

उमराणे : येथील आठवडे बाजार नूतन जागेत स्तलांतरित करण्यात आला असून, परसूल नदीकाठावरील आमराई येथे हा आठवडे भरविण्यात येत आहे. स्थलांतरित आठवडे बाजाराचा शुभारंभ सरपंच सोनाली देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ व पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते येथील खंडेराव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यापूर्वी सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाजवळील जागेवर आठवडे बाजार भरत होता; परंतु उमराणे येथे युती शासनाच्या काळात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने जागेअभावी हा प्रश्न शासनदरबारी बºयाच वर्षांपासून धूळ खात पडला होता. नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न असल्याने ग्रामपंचायतीने २००४ साली तीन एकर जागा ठरावाद्वारे ग्रामीण रुग्णालयासाठी दिली होती. परिणामी आठवडे बाजारासाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर पर्याय म्हणून पूर्वीची आमराई असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीची जवळजवळ साडेतीन एकर जागा आठवडे बाजारासाठी उपलब्ध करण्यात येऊन या जागेवर बुलडोझर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने सपाटीकरण करण्यात आले. आगामी काळात या परिसरात जॉगिंग पॉइंट तयार करण्याचा मानस बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांनी बोलून दाखविला. आठवडे बाजार शुभारंभप्रसंगी बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, जि. प. चे माजी सदस्य प्रशांत देवरे, माजी सरपंच रामदास देवरे, सुभाष देवरे, उपसरपंच प्रकाश ओस्तवाल, बाळासाहेब देवरे, सचिन देवरे, चिंतामण देवरे, नंदन देवरे, भरत देवरे, गोरक्षक सुनील देवरे उपस्थित होते.

Web Title: Migrating Weeks in Umraane Launch of Migratory Weekly Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.