कोरोनामुळे कुटुंबीयांसह विद्यार्थ्यांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:30+5:302021-03-19T04:14:30+5:30
नाशिक : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यावर्षीही दोन ते तीन टक्क्यांनी घट होण्याचे ...
नाशिक : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यावर्षीही दोन ते तीन टक्क्यांनी घट होण्याचे संकेत दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातून गतवर्षी सुमारे ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. ७५ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यावर्षी परीक्षेाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतच जवळपास दोन ते अडीच टक्क्यांनी घट झाली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरात गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून अनेक कुटुंब स्थलांतरित होऊन मूळ गावी परतले. यात परप्रांतीय कुटुंबाचाही समावेश होता. अशा परप्रांतीय स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांसमवेत विद्यार्थीही स्थलांतरित झाल्याने परीक्षार्थींच्या संख्येत घट झाल्याचा अंदाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटात बारावीच्या परीक्षा झाल्या असल्या तरी दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला होता. यावर्षीही ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा संसर्ग राज्यभर वाढला आहे. नाशकात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनामुळे यावर्षी शाळा बंद राहिल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पुढे ढकण्यात आल्या असून सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणीसाठी अजूनही मुदत असून परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करणे शक्य आहे. त्यामुळे सध्याच्या आकड्यात वाढ होणार असली तरी ही वाढ अत्यल्प प्रमाणात राहण्याचे संकेत आहेत.
--
पॉईंटर
२९ एप्रिल ते २० मे २०२१
२३ एप्रिल ते २१ मे २०२१
दहावीचे विद्यार्थी
२०२०- ९७९१२,
२०२१- ९५७३४
बारावीचे विद्यार्थी
२०२०- ७५३४३,
२०२१- ७४४०३
दहावी पुनर्परीक्षार्थी -२७२०
बारावीचे पुनर्परीक्षार्थी -१५७३
---
दहावी बारावीचे किती विद्यार्थी यंदा परीक्षा देतील हा आकडा आजच सांगणे कठीण
आहे. कारण परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षण मंडळाकडून परीक्षार्थींची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाते. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत हे आताच सांगणे कठीण आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
--
नियमित विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थींची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये कुटुंबाला मदतीसाठी धावल्याने शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर आहेत. पुन्हा कोरोनाचे संकट ओढवले असून, लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींची संख्या घटणार आहे.