येवला  शहरातील भाजीबाजाराचे अखेर स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:34 AM2018-05-08T01:34:47+5:302018-05-08T01:34:47+5:30

शहरातील ४२६ भाजीपाला व फळविक्रेत्यांना केशवराव पटेल मार्केटमध्ये जागा पुरेशी ठरत नसल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांना पालिकेने हाजीबाबा दर्गाह अर्थात आठवडे बाजारात जागा देण्याची कार्यवाही नगरपालिकेने केली आहे.

The migration of vegetable market in Yeola finally | येवला  शहरातील भाजीबाजाराचे अखेर स्थलांतर

येवला  शहरातील भाजीबाजाराचे अखेर स्थलांतर

Next

येवला : शहरातील ४२६ भाजीपाला व फळविक्रेत्यांना केशवराव पटेल मार्केटमध्ये जागा पुरेशी ठरत नसल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांना पालिकेने हाजीबाबा दर्गाह अर्थात आठवडे बाजारात जागा देण्याची कार्यवाही नगरपालिकेने केली आहे.  भाजीपाला व फळमार्केट व्यावसायिकांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि नवीन जागेत पुन्हा बाजार फुलला आहे. एकाच ठिकाणी मार्केट असल्याने व्यवसाय चांगला होणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी नवीन जागेत, कॉँक्रीटीकरणासह ओटे व सर्व मूलभूत सुविधा लवकरात लवकर द्याव्यात, अशी मागणी भाजीपाला व फळविक्रेत्यांनी केली आहे.  स्थलांतरित केलेल्या भाजी मार्केटमध्ये असुविधा आहेत. या भागात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. दक्षिणेकडून येणाऱ्या रस्त्यात नाला उघडा असल्यामुळे तेथे दुर्गंधी येते. याठिकाणी सिमेंट पाइप  टाकण्यात यावा. उशिरापर्यंत बाजार असावा यासाठी पथदीपाची संख्या वाढवण्यात यावी. गणपती मंदिराजवळील येणाºया रस्त्यात वळणाच्या ठिकाणी बसणाºया फळविक्रेत्यांना वळणापासून थोडे मागे बसविण्यात यावे.  परिसरात दुर्गंधी पसरू नये म्हणून कचरा टाकण्यासाठी एक कायमस्वरूपी कचराकुंडी असावी, अशा मागण्या भाजीपाला विक्रेत्यांनी केल्या आहेत.

Web Title: The migration of vegetable market in Yeola finally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.