नाशिकला जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:46 AM2018-07-15T01:46:51+5:302018-07-15T01:46:57+5:30
नाशिक : शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कल्याण तसेच भिवंडी येथे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लगतच्या नाशिकमध्येही रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दिंडोरी रोडवरील मेरी येथील भूकंपमापक यंत्रावर भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद झालेली आहे. दरम्यान, भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असले तरी याबाबत जिल्हा प्रशासन गाफील राहिले़

शुक्रवारी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी नाशिकला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंप झाला असला तरी तशा हालचाली किंवा घरातील भांडी जमिनीवर पडली किंवा हादरे बसले असे प्रकार घडले नाहीत. भूकंपमापक यंत्रावर तीन रिश्टर स्केलची नोंद झाली आहे.
नाशिकच्या वेधशाळेपासून किमान १०४ किमी अंतरावर हा भूकंप झाला असल्याचे भूकंपमापक केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री नाशिकलाही तीन रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले असले तरी ते अत्यंत सौम्य प्रकारचे असल्याने नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारची वित्त वा जीवितहानी झालेली नाही.