पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:55+5:302021-07-21T04:11:55+5:30
नाशिकपासून साधारण ४० किमी अंतरावर सकाळी ७ वाजता धक्के जाणवले असून ३ रिश्टल स्केल तीव्रता असल्याची नोंद झाली आहे. ...
नाशिकपासून साधारण ४० किमी अंतरावर सकाळी ७ वाजता धक्के जाणवले असून ३ रिश्टल स्केल तीव्रता असल्याची नोंद झाली आहे. पेठ तालुक्यातील गोंदे, जोगमोडी, एकदरे, आसरबारी, आसदनपाडा, मोहपाडा, जांभूळमाळ, हेदपाडा, कोहोर, पेठ, खोकरतळे, भायगाव या गावासह परिसरात धक्के जाणवले. प्रारंभी जमीन थरथरल्यासारखे होऊन भूगर्भात झालेल्या हालचालींचा आवाज जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरीही पेठ तालुक्यात वारंवार बसणारे धक्के तालुकावासीयांची धडकी भरवणारी असल्याचे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.