मन्याड नदीत गाळमुक्त अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 10:59 PM2019-03-07T22:59:48+5:302019-03-07T23:00:18+5:30

अंदरसूल : टाटा ट्रस्ट, युवामित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसूल येथे जहागीरदार वस्तीलगत बंधारा व मन्याड नदीपात्रात प्रारंभ करण्यात आला.

Mile-free campaign in the river Miyad | मन्याड नदीत गाळमुक्त अभियान

अंदरसूल येथे गाळमुक्त अभियानाच्या शुभारंभप्रसंगी अधिकारी व लोकप्रतिनिधी.

Next
ठळक मुद्देशासन योजना : युवामित्रकडून मशिनरी उपलब्ध

अंदरसूल : टाटा ट्रस्ट, युवामित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसूल येथे जहागीरदार वस्तीलगत बंधारा व मन्याड नदीपात्रात प्रारंभ करण्यात आला.
या योजनेअंतर्गत इंधनाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेतून केला जाणार असून, युवामित्र संस्थेने मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. या कामाचे स्वरूप युवामित्रच्या अधिकारी दीपाली वाघ यांनी सांगितले. त्यातून अंदरसूल ग्रामपंचायतीने आवश्यक ते ठराव करून सर्व बंधारे गाळमुक्त व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
या प्रक्रियेत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे, प्रकल्प अभियंता धनंजय देशमुख, येवला तालुका समन्वयक दीपाली वाघ, आकाश चिने आदी सहभागी होते.
याप्रसंगी जलसंधारण अधिकारी शेळके तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, अंदरसूलच्या सरपंच विनिता सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार, शिवसेना नेते दत्तू सोनवणे, दत्तात्रेय सोनवणे, अण्णासाहेब ढोले, धनंजय जहागीरदार, प्रकाश बजाज, जनार्दन जानराव, सुभाष सोनवणे आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. भविष्यात पाणी साठवण वाढून त्याचा मोठा फायदा शिवारला होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Mile-free campaign in the river Miyad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.