'इनोव्हेशन हब' औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीत मैलाचा दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 07:34 PM2018-11-24T19:34:25+5:302018-11-24T19:35:33+5:30

भाजपाप्रणित उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचेशी केलेली हितगुज...

Milestone in the direction of 'Innovation Hub' industrial area | 'इनोव्हेशन हब' औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीत मैलाचा दगड

'इनोव्हेशन हब' औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीत मैलाचा दगड

googlenewsNext
ठळक मुद्देइनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी हे अधिकृत केंद्र र नाशिकच्या उद्योगांना चालना मिळणार

प्रस्तावित इनोव्हेशन हब नाशिकला 15 दिवसात करण्यात येईल अशी घोषणा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी नुकत्याच नाशिक दौऱ्यात केली होती. त्या अनुषंगाने भाजपाप्रणित उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचेशी केलेली हितगुज...
 प्रश्न :- नाशिकला इनोव्हेशन हब खरच होणार आहे का ?इनोव्हेशन हब म्हणजे नेमके काय ?
उत्तर :- नाशिकला इनोव्हेशन हब होणारच आहे.कारण संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी स्वतः जाहीर केले आहे.शिवाय संरक्षण(उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी नाशिकला भेट देऊन चाचपणी केली आहे.संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही तत्वतः मंजुरी दिली आहे.तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे नाशिकला इनोव्हेशन हब होणारच आहे.त्यासाठी जिल्ह्यातील अग्रणी असलेल्या निमा,आयमा,लघुउद्योग भारती,उद्योग आघाडी यासह औद्योगिक संघटनांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे नाशिकला देशातील दुसरे इनोव्हेशन हब होणार आहे.(पहिले कोईमतूर येथे होणार आहे.) इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक उद्योगाने इंनोव्हेशन ग्रुप तयार करून आऊट ऑफ द बॉक्स विचार प्रणाली आमलात आणावी.अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी उद्योजक इनोव्हेशनद्वारे प्रत्यक्षात उतरवतील व डिफेन्स इनोव्हेशनद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.एचएएल व भारत इलेक्ट्रॉनिक्स यांची इनोव्हेशन हबमध्ये भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.त्यातून देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेची भावी दिशा ठरणार आहे.संरक्षण साहित्य व समुग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असणार आहे.डिफेन्स इनोव्हेशनहबद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.नाशिक औद्योगिक क्षेत्र मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आधीच नावाजलेले आहे.नाशिकच्या उद्योगांची क्षमता पाहता डिफेन्स इनोव्हेशनहबद्वारे संरक्षण क्षेत्रात देखील मोठे योगदान देतील.बऱ्याच वर्षांनंतर संरक्षण साहित्याच्या आयातीला पर्याय म्हणून देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.त्यामुळे आगामी डिफेन्स इनोव्हेशनद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.नाशिकच्या उद्योगांची योगदान देण्याची क्षमता मोठी असुन डिफेन्स इनोव्हेशन हबची स्थापना ही नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरणार आहे.
 प्रश्न :- केंद्र सरकारने उद्योजकांसाठी कोणत्या महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत ? त्यांचा लाभ उद्योगांना मिळाला आहे का?
उत्तर :- केंद्र सरकारने उद्योजकांसाठी 12 विविध योजना जाहीर केलेल्या आहेत.त्यात 59 मिनिटात कर्ज मिळण्याची पात्रता,एमएसएमइ साठी 100 दिवसांचे मिशन,स्टँडअप योजना,स्टार्टअप योजना,मुद्रा योजना,महिला उद्योग धोरण योजना फक्त महाराष्ट्रात सुरु केली आहे.मुद्रा योजनेचा 3 लाख लोकांनी लाभ घेतला आहे.या योजनांची अमंलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरु आहे.काही बँकांचे नकारात्मक धोरण पाहता ऑन लाईन पोर्टल सुरु करण्याची मागणी केली होती.ती मागणी मान्य झाली आहे.उद्योगांसाठी खूप चांगल्या योजना जाहीर केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया योजनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे.
प्रश्न :- इनोव्हेशन हबमुळे नाशिकच्या उद्योजकांना किती आणि कसा लाभ होणार आहे ?
उत्तर :- प्रस्तावित इनोव्हेशन हब हे कारखाना नसून इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी हे अधिकृत केंद्र रहाणार आहे.संरक्षण क्षेत्राला लागणारे उत्पादन करु इच्छिणाऱ्या उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. असे उद्योजक अन्य देशांना संरक्षण सामुग्री निर्यात करु शकतील. प्रस्तावित इनोव्हेशन हबमुळे कोणतीही मोठी गुंतवणूक होणार नाही किंवा मोठे रोजगार उपलब्ध होणार नाहीत तर नाशिकच्या उद्योगांना चालना मिळणार आहे.
- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष उद्योग आघाडी.

Web Title: Milestone in the direction of 'Innovation Hub' industrial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.