मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:49 PM2020-06-22T16:49:38+5:302020-06-22T16:53:38+5:30

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते.

Military larvae attack maize crop | मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला

Next
ठळक मुद्देपहिल्या पंधरवड्यातच निम्मे पीक बाधित : शेतकऱ्यांनी फिरवला पाच एकरावर ट्रॅक्टर

लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होऊन बाजारभाव २००० ते २२०० रु पयांपर्यंत वधारले होते. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने स्थानिक उत्पादकांना याचा फायदा झाला नाही. मक्याचे दर निम्म्याने घसरले आहे. त्यावर शासनाची मलमपट्टी म्हणून मका पिकाची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. परंतु शासनाकडे पुरेसे बारदान, वजनकाटे, गुदामे उपलब्ध नसल्याने ही खरेदी कासव गतीने सुरू आहे.
अशा परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे पट्ट्यात मागील पंधरवड्यात ७० ते ८०टक्के शेतकºयांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा आदी तालुक्यात विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर आदी परिसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पीक समजले जाते. प्रारंभीच मका रोपांवर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. बहुतांश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी काही भागावर प्रादुर्भाव वाढला आहे. लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्नाची शास्वती वाटत नसल्याने विठेवाडी येथील शेतकरी व माजी सरपंच नंदलाल निकम यांनी त्यांच्या चार एकरावरील मका पिकावर ट्रॅक्टर फिरवला. त्यांनी पाच एकर क्षेत्रात सीजेंटा ६६६८ जातीच्या वाणाचे बियाणे ४ जूनला टाकले होते. त्यासाठी १३ किलो बियाणे घेतले होते.
त्यासाठी पेरणी, मशागत, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक आदींकरिता सुमारे ४० हजार रु पये खर्च करूनही लष्करी अळी आटोक्यात येईल, याची खात्री नसल्यामुळे त्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सदर घटना तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना कळविली असून त्यांनी शेतकºयाच्या बांधावर येऊन पाहणी करावी व परिसरातील शेतकºयांना लष्करी अळीपासुन संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे.
देवळा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरुवातीलाच मका पीक लष्करी अळीने बाधित झाले आहे. यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून सागंण्यासाठी शासकीय कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेने पुढाकार घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: Military larvae attack maize crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.