नाशिकमधील दुधाच्या एटीएमचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:13 AM2018-01-26T03:13:04+5:302018-01-26T03:13:18+5:30
पैसे आणि पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले आहे.
नाशिक : पैसे आणि पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले आहे. कॉलेज रोडवरील या एटीएमचे उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर १० रु पयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकेल.