दुधाळ जनावरांच्या किमती वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:08 PM2020-02-22T23:08:01+5:302020-02-23T00:22:40+5:30

खडकी : दुधाचे दर वाढले असले तरी ग्रामीण भागात शेतकरी उत्पादकांकडून ३४ ते ३६ रुपये दराने दूध खरेदी केली ...

Milk business in crisis due to rising milk prices | दुधाळ जनावरांच्या किमती वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटात

दुधाळ जनावरांच्या किमती वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देउद्योगाला ग्रहण । गायी-म्हैशी खरेदीचे प्रमाण घटले

खडकी : दुधाचे दर वाढले असले तरी ग्रामीण भागात शेतकरी उत्पादकांकडून ३४ ते ३६ रुपये दराने दूध खरेदी केली जात आहे. डेअरीवरील वाढलेल्या ८ रुपये फॅटच्या दराने म्हैस व गायींची किंमत एक लाखावर गेल्याने दूध उत्पादक संकटात सापडला आहे. यामुळे दुय्यम उद्योगाला ग्रहण लागले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके बसत असतानाच दुधाच्या दराचे व म्हैस खरेदीच्या दराने दूध उत्पादक होरपळले जात आहे. पावसाळा चांगला झाला असल्याने विहिरींना पाणी टिकून आहे. शेती उत्पादनाचे दर फारसे चांगले नसल्याने दुय्यम व्यवसायातून नगद पैसे मिळवून देणाऱ्या दूध व्यवसायाला चांगले दिवस आले होते. मात्र त्यातही दुधाचे दर व खर्च यांचा ताळमेळ अवघड झाले आहे. उन्हाळा सुरू झाल्यावर दुधाची टंचाई भासते. या दुधाची पूर्तता करण्यासाठी नवीन पशुधनाची आवश्यकता आहे; मात्र म्हैस व गायी खरेदीचे दर गगनाला भिडले आहेत. दोन म्हशींची किंमत दोन लाख १० हजारावर झाली आहे. यामुळे उन्हाचे चटके आजच जाणवू लागल्याने अजून तीन महिन्यांचा काळ शिल्लक राहिलेला आहे. दूध किंवा भाजीपाला विक्रीच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम लग्नसमारंभ साजरे करण्यासाठी कामी येते मात्र मिळकत मोठे कष्ट करूनही कमी होणार आहे.
पशुधन पाळणाऱ्यांसाठी शेतकºयांना विविध योजनांची भुरळ घातली जाते. शासनाकडून योजनांचा पाऊस पाडला जातो. मात्र त्यावर आधारित उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. चारा, ढेप, भुसार खाद्य अनुदानातून दिले गेले तरच शेतकरी दूध उत्पादक तारला जाणार आहे. गतवर्षी चारा व सरकी ढेपीचे भाव गगनाला भिडले होते. २ हजार ४०० रुपये ६० किलोच्या भावाने सरकी ढेप दुधाळ जनावरांना खाऊ घातली होती. ४ त ५ हजारापर्यंत
उसाचा खुराक देऊन जनावरे जिवंत ठेवण्यास मोठी कसरत करावी लागली होती. यातून शेतकरी सावरला असला तरी दुधाचे दर अद्यापही सुधारलेले नसल्याने शासनाने शासकीय डेअरी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी दूध उत्पादकांनी केली आहे.
शेतकºयांनी नवीन उत्पादनाला फाटा देऊन हिरव्या चाºयाला पसंती देत शाळू, मका, खोंडे, घास आदींची लागवड केली आहे. ग्रामीण भागातील दूध संकलन करणाºया व्यापाºयावर कुठलाही वचक नसल्याने मनमानी भावाने दूध संकलित करीत आहेत. आगाऊ पैसे घेतलेल्या शेतकºयांना ही रक्कम फेडणे कठीण झाल्याने त्याचा गैरफायदा घेत आहेत. विनापरवानगी दूध संकलित करणाºया व्यापाºयांना परवाना देऊनच दुधाचे दर ठरवून देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकºयांचा हा भरवशाचा व्यवसाय खाईत जाणार आहे.

Web Title: Milk business in crisis due to rising milk prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.