१ आॅगस्टपासून दूध संकलन बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 09:46 PM2020-07-29T21:46:26+5:302020-07-30T01:52:03+5:30
नांदगाव : दुधाचे भाव वाढून मिळावे अन्यथा शनिवारपासून (दि. १) दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
नांदगाव : दुधाचे भाव वाढून मिळावे अन्यथा शनिवारपासून (दि. १) दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा, वादळामुळे व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या संकटांमध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा नाही. यातच दुधाचे भाव कमी झाल्याने शासनाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये, दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान व शासनाकडून ३० रुपये प्रतिलिटर दूध खरेदी करावी अशा मागण्या आहेत. निवेदनावर भाजप सरचिटणीस भाऊराव निकम, तालुकाध्यक्ष बापू जाधव, शहराध्यक्ष उमेश उगले, संदीप पवार आदींच्या सह्या आहेत.