दूध उत्पादकांनी पोषक तत्त्वांचे मिश्रण वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:15 AM2020-01-10T00:15:04+5:302020-01-10T00:15:50+5:30

पोषक तत्त्व मिश्रित अन्नपदार्थांची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनपातळीवरून जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रकांत साळुंके यांनी केले.

Milk producers should increase their nutrient mix | दूध उत्पादकांनी पोषक तत्त्वांचे मिश्रण वाढवावे

दूध उत्पादकांसाठी आयोजित कार्यशाळेत सहभागी झालेले सहआयुक्तचंद्रकांत साळुंके. समवेत डॉ. हितेश गुप्ता, डॉ. कुसुम, सायली पटवर्धन, डॉ. हरीश गांगुर्डे आदींसह दूध उत्पादक.

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांत साळुंके : जीवनसत्वांना प्राधान्याची गरज

सातपूर : पोषक तत्त्व मिश्रित अन्नपदार्थांची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनपातळीवरून जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रकांत साळुंके यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन आणि वात्सल्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागातील पॅकेज दूध उत्पादकासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. साळुंके यांनी पुढे सांगितले की, भारतीय अन्नसुरक्षा व माणके प्राधिकरणाने मागच्या वर्षी संपूर्ण देशात ‘योग्य तेच खा’ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. दुधात पोषक तत्त्व मिश्रणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. वात्सल्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हितेश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक तज्ज्ञ डॉ. हरीश गांगुर्डे यांनी आजच्या जीवनशैलीमुळे बहुतेक व्यक्तीमध्ये जीवनसत्व अ, ड, क यांची कमतरता व त्यांची लक्षणे दिसत असल्याचे सांगितले. दुधामध्ये पोषकतत्त्व मिश्रण तंत्रज्ञान अतिशय सोपे आहे, असे मिश्रण केलेले दूध दिसण्यास व चवीला नियमित दुधासारखे असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष पोषकतत्त्व मिश्रण प्रक्रिया कशी करावयाची, घ्यावी लागणारी काळजी याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सायखेडा येथील डेरी पावरतर्फे सर्वांना दुधात पोषकतत्त्व मिश्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या कार्यशाळेत अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे ८० प्रतिनिधी तसेच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
दर्जा नियंत्रणावर अशी घ्यावी काळजी
अन्नसुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी ‘दूध उत्पादकांनी कायद्यातील तरतुदीनुसार दर्जा नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी’ या विषयावर सादरीकरण केले. वात्सल्य संस्थेच्या डॉ. कुसुम यांनी पोषक तत्त्व मिश्रणाची गरज विशद केली. तरुणांची मोठी संख्या देशाच्या प्रगतीसाठी फायद्याची असताना बहुतांश तरुणांमध्ये महत्त्वाच्या जीवनसत्त्वे व खनिजांची कमतरता आहे याचा नकारात्मक परिणाम तरुण पिढीच्या उत्पादकतेवर पडत आहे.

Web Title: Milk producers should increase their nutrient mix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.