राज्यातील दूध उत्पादक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:40+5:302021-06-09T04:18:40+5:30
चौकट- राज्यभरात दीड कोटी लिटर संकलन राज्यात दर दिवशी सुमारे दीड कोटी लिटरच्या आसपास गाईच्या दुधाचे संकलन केले जाते. ...
चौकट-
राज्यभरात दीड कोटी लिटर संकलन
राज्यात दर दिवशी सुमारे दीड कोटी लिटरच्या आसपास गाईच्या दुधाचे संकलन केले जाते. संकलित दुधापैकी ४० टक्के दुधाची पावडर आणि इतर उपपदार्थ बनविले जातात. उर्वरित दूध पिशवीच्या माध्यमातून थेट ग्राहकांना विकले जाते. यावर्षी कोरोनामुळे मागणी घटल्याने दूध पावडरचे दर घटले. त्याचा थेट परिणाम दुधाच्या दरावर झाला.
चौकट-
दही, ताक, आइस्क्रीमला मागणी नाही
लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार, हॉटेल्स, विवाह सोहळे व इतर धार्मिक कार्यक्रम बंद झाले. हॉटेल्समधून बटर, पणीर, दही, ताक, लस्सी, आइस्क्रीम यांना मागणी असते. मात्र मार्चपासून मागणी कमी झाल्याचा दावा दूध संकलन केंद्रांकडून केला जात आहे.
कोट-
लॉकडाऊनमुळे दुधाचा उठाव कमी झाला आहे. दूध संस्थांची स्थानिक विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे दुधाचे दर घसरले आहेत. आता लॉकडाऊन उठले आहे जर सर्व सुरळीत राहिले तर किमान २० - २५ दिवसांत दुधाच्या दरात थोडीफार सुधारणा होण्याची शक्यता आहे.
-सूर्यभान शिरसाट, सचिव, सिद्धेश्वर दूध संस्था
कोट-
हिरवा चारा, ढेप यांचे दर गोणीमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना गाई-म्हशी पाळणे कठीण झाले आहे. कोरडा चारा चार हजार रुपये शेकड्यापर्यंत जातो. असा खर्च वाढत असताना दुधाला १८-१९ रुपये लिटरचा भाव देता हे कितपत योग्य आहे. - शंकरराव ढिकले, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना, जि. नाशिक