ग्रामीण भागात दूध टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 07:05 PM2019-04-05T19:05:17+5:302019-04-05T19:07:20+5:30
खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.
खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.
पूर्वीच्या माणसाची म्हण होती की घर तेथे खुटा म्हणजे प्रत्येक घरापुढे गायी, म्हशी, बैल असे पशुधन असले पाहिजे. अगदी राजे-महाराज यांच्या काळापासून वाड्यात गायी, म्हशी, पाळण्याची प्रथा प्रचलित होती. पूर्वी कोरड व्हावु शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. गावात अगदी मोजक्याच लोकांकडे अल्प प्रमाणात बागयती शेती होती. पावसाचे प्रमाण भरपूर असायचे, त्यामुळे गुरांना चरण्यासाठी रानात मोबलक चारा असायचा. शेतीशी निगडित दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असे.
मोठ्या शेतकऱ्याकडे गुरे चारण्यासाठी घरातील किंवा सालाने एक माणूस राहत असायचा. त्यामुळे दूध मोठ्या प्रमाणात मिळत होते. गावातील ज्या लोकांकडे गायी असे त्या गावातील एक माणूस गायी चारण्यासाठी नेत असे त्यास गवाऱ्या म्हटले जात असे. त्याला गायी चारण्याचा मोबदला म्हणून पैसे, किंवा धान्य दिले जात होते.
विज्ञान युगामध्ये शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. जिरायती शेतीचे बागायती झाली. त्यामुळे गायी, म्हशींना चरण्यासाठी मुबलक रान राहिले नाही. पावसाचे प्रमाण कमी-कमी होत चालल्याने चारा टंचाई जाणवू लागला आहे. गायी-म्हशींचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने, ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा -वीस गायी असायच्या त्यांच्याकडे आता एक किंवा दोन गायी-म्हशी आहेत.
पूर्वी भरपूर प्रमाणात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला जात असे. दुधाचे पैसे हे आठवडयाला किंवा महिन्याला मिळतात. या दुधाच्या आलेल्या पैशातून शेतीतील माणसाची मजुरी, पिकासाठी औषधे व त्यांचा प्रपंच दुधाच्या येणाºया पैशातुन चालत असे. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने उन्हाळ्यात विहिरींना पाणी राहत नाही. त्यामुळे दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील झाल्याने गायी-म्हशी कमी झाल्या. जनावरांच्या किमतीही वाढल्या. घराघरात फ्रिज आल्याने तसेच बाजारात दुधाच्या पिशव्या मिळू लागल्याने दूध व्यवसायाकडे शेतकºयांने पाठ फिरवल्यामुळे दूधटंचाई जाणवू लागली आहे. (फोटो ०५ दुध, ०५ दुध १))