आडवाडीच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:44 PM2018-11-14T17:44:41+5:302018-11-14T17:45:04+5:30

सिन्नर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून गीर गायींसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने वाढलेल्या दुग्धोत्पादनामुळे तालुक्यातील आडवाडी येथील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Milk supply to the farmers of AWWW | आडवाडीच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनाने दिलासा

आडवाडीच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनाने दिलासा

Next

सिन्नर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून गीर गायींसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने वाढलेल्या दुग्धोत्पादनामुळे तालुक्यातील आडवाडी येथील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिन्नर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेले आडवाडी गाव डोंगरावर वसलेले आहे. संपुर्ण डोंगर परिसरात वाळलेल्या गवताशिवाय काहीच दिसत नाही. गेल्या तीन वर्षापासून पाऊस अत्यंत कमी झाल्याने शेतकºयांना पिके जगविणे कठीण होत आहे. पारंपरिक भातपिकही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी दुग्धोत्पादनातून आपल्या कुटुंबाला सावरले आहे.
येथील शेतकरी पारंपरिक शेती करताना भात पिक घेतात आणि म्हैस, जर्सी गार्इंचे पालन करून दुध विक्र ी करतात. यावर्षी कृषी विभागाने कोरडवाहू शेती विकास योजनेतून ४० गीर गायींसाठी प्रत्येकी २० हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. गीर गायीचे दुध जर्सीपेक्षा अधिक मिळू लागल्याने शेतकरी पशुपालनाकडे वळू लागले आहेत.
गावात कृषी विभागाने या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४० गायी दिल्या आहेत. गावात दुग्धोत्पादन २०० लिटरची वाढ झाली आहे. शेतकºयांनी एकत्र येऊन नंदनवैभव हा शेतकरी गट स्थापन केला असून त्याद्वारे दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत आहे. प्रत्येक शेतकºयाला त्यामुळे महिन्याला दोन ते चार हजार रूपये अतिरिक्त लाभ होत आहे. कृषी विभागातर्फे योजनेअंतर्गत मुरघास युनिट, पॅक हाऊस, आणि कंपोस्ट युनिटलाही अनुदान देण्यात येणार आहे. निसर्ग कोपला असताना गावात आलेल्या गीर गायींमुळे शेतकºयांना धवल क्रांतीकडे वळण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. सिन्नरच्या बाजारात या गटाने प्रवेश केला आहे. दुग्धजन्य पदार्थांची ब्रँडींग आणि पॅकेजिंकचे तंत्र आत्मसात करून उत्पन्न वाढविण्याकडे या शेतकºयांची वाटचाल सुरू आहे. पुढील काळात गीर गायींची संख्या वाढविण्याचा मनोदय शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: Milk supply to the farmers of AWWW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध