व्यापाऱ्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार मालेगावला शेतकºयांची रक्कम थकली : व्यापारी बांगलादेशला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:41 AM2018-05-09T01:41:28+5:302018-05-09T01:41:28+5:30

नाशिक : दोन महिन्यांत शेतकºयांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी करून बांगलादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतकºयांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांना साकडे घातले आहे

Milkworld farmers 'auctioned for merchants' properties: Businessman missing Bangladesh | व्यापाऱ्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार मालेगावला शेतकºयांची रक्कम थकली : व्यापारी बांगलादेशला बेपत्ता

व्यापाऱ्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार मालेगावला शेतकºयांची रक्कम थकली : व्यापारी बांगलादेशला बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देसंपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणेशेतकरी आत्महत्या करण्याची भीती

नाशिक : दोन महिन्यांत शेतकºयांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी करून बांगलादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतकºयांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांना साकडे घातले आहे. मालेगाव तालुक्यातील शिवाजी सूर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला. सुमारे साडेतीन कोटी रुपये शेतकºयांना देणे असताना सूर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापाºयाला सदरचा कांदा पाठविला. परंतु तेथून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले असून, अद्यापही तेथून परत आलेले नसल्याचे व त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणे आहे. शेतकºयांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रुपये वसूल करून शेतकºयांना वाटप केले. परंतु तरीही अन्य शेतकºयांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भीती बाजार समितीला वाटू लागली आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकीची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून ठेवलेली आहे. तर त्यांचे जामिनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारली असल्याने त्यांचा उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. या दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसीलदारांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु निव्वळ मालमत्तेवर बोजा चढवून शेतकºयांची रक्कम वसूल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सूर्यवंशी व जामिनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.

Web Title: Milkworld farmers 'auctioned for merchants' properties: Businessman missing Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार