गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो होणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 03:46 PM2020-09-13T15:46:21+5:302020-09-13T15:47:11+5:30
साकोरा : नासिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण यावर्षी देखिल शंभरीकडे वाटचाल करतांना दिसत आहे. सध्यस्थितीत गिरणा धरणात मृतसाठा वगळता २० हजार ८द. ल. घ. फूट म्हणजे ९२.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहीती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.
साकोरा : नासिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण यावर्षी देखिल शंभरीकडे वाटचाल करतांना दिसत आहे. सध्यस्थितीत गिरणा धरणात मृतसाठा वगळता २० हजार ८द. ल. घ. फूट म्हणजे ९२.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहीती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.
गतवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा गिरणा धरणाने नव्वदी पार केल्याने परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. विशेष म्हणजे धरणाच्या वरील भागातून आवक मंदावली असली तरी साठयात हळूहळू वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील गेल्या आठवड्यापासून झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत असून, परिणामी गिरणा धरणाची वाटचाल सलग दुसर्या वर्षी शंभरीकडे होतांना दिसून येत आहे.
गेल्या वर्षी आॅगस्ट मिहन्याच्या सुरु वातीलाच गिरणा धरणात केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अतिवृष्टि नंतर ठेंगोडा, हरणबारी, चनकापूर ठेंगोडा बंधारा हे ओहरफ्लो झाल्याने धरणातून १ आॅगस्टपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी महिनाभरातच तब्बल ११ वर्षांनंतर गिरणा धरणात शंभर टक्के साठा झाला होता. त्यामुळे यंदा देखील पावसाळ्याच्या सुरु वातीला जुन २०२० मध्ये धरणात ३४ टक्के म्हणजे ६३००.९० दशलक्ष घनफूट साठा शिल्लक होता. त्यानंतर गेल्या तीन मिहन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे गिरणा धरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ झाली असून, गिरणा धरणातील साठा नाशिक जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असतो मालेगाव सह गिरणा पट्यात चांगला पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरते यातील चनकापूर, हरणबारी केळझर नाग्या-साक्या माणिकपुंज धरण ओहरफ्लो झाली आहेत. सध्या गिरणा धरणात हरणबारी, केळझर ,ठेगोडा बंधारा व चनकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आराम मोसम आण िगिरणा नदीतून देखील धरणात पाण्याची आवक सुरू आहे सध्या पाण्याचा प्रवाह मंदावला असला तरी संथगतीने का असेना परंतु गिरणा धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट असून त्यात मृतसाठा धरून म्हणजे ९२.३३ टक्के इतका साठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.त्यामुळे आता नासिक आणि जळगांव या दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याच्या तसेच जलसिंचनाच्या पाण्याचा काही वर्ष तरी प्रश्न राहणार नाही.फक्त नांदगाव तालुक्यातील ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेला दुरूस्तीची गरज असून तीला शासकीय मदतीचा पुरेपूर वापर झाल्यास १०० टक्के ही योजना कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याच्या अफवा
सध्यास्थितीत गिरणा धरण ९२.३३ टक्के भरले असून ९६ टक्के भरल्यानंतरच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र गिरणा धरणातून पाणी विसर्ग करण्यात येत असल्याच्या व्हाट्सॅप, फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत असून, गिरणा धरण ९६ टक्के भरल्यानंतरच गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.
-एस. आर. पाटील,शाखा अभियंता,गिरणा धरण.(फोटो१३साकोरा,१)