लाखो समर्थ सेवेकऱ्यांनी घरीच केले गुरु पुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 03:46 PM2020-07-05T15:46:58+5:302020-07-05T15:46:58+5:30
दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून भरतवासियांची सुटका व्हावी यासाठी सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले.
दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून भरतवासियांची सुटका व्हावी यासाठी सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी दिंडोरी येथील समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, त्र्यंबकेश्वर येथील गुरु पीठ व देश आणि देशाबाहेरील असंख्य केंद्रांवर गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते,परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम पाळून सेवेकरी महीला, पुरु षांनी, बाल गोपाळ यांनी हा उत्सव घरीच साजरा केला.
दिंडोरी येथे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर येथे गुरु पीठ व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी गुरु पादुका पूजन केले. तद्नंतर त्यांनी आॅनलाईन जगभरातील लाखो सेवेकऱ्यांनाशी संवाद साधला.
सकाळी दिंडोरी व त्र्यंबकेश्वरमध्ये मोजक्याच सेवेकºयांच्या उपस्थितीत पदुकापुजन, महाराजांची पूजा, अभिषेक, आरती संपन्न झाली. घरी सर्वांनी श्री सुक्त, पुरु ष सुक्त, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची पारायणे केली. सकाळी ११ वाजता गुरु माऊली यांनी तर १२ वाजता चंद्रकांतदादा मोरे यांनी यु ट्यूब वरून मार्गदर्शन केले. या थेट मार्गदर्शनाचा लाभ परदेशातीलही हजारो सेवेकरी महीला, पुरु षांनी घेतला.
मोजक्या सेवेकºयांच्या उपस्थितीत गुरु पौर्णिमा
स्वामी समर्थ केंद्र मुख्य दरबार असलेल्या दिंडोरीत यंदा कोरोनामुळे स्वामी समर्थ केंद्रातर्फे सेवेकºयांना ये्ेथे न येता घरीच गुरु पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सेवेकºयांनी प्रत्यक्ष न येता घरीच गुरु पूजन केले. गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांनी आॅनलाइन सेवेकाºयांशी हितगुज करत मार्गदर्शन केले. दिंडोरी शहर व नाशिक जिल्ह्यातील काही भाविकांनी केंद्रात येत दर्शन घेतले प्रथमच दिंडोरीत गुरु पौर्णिमेला गर्दी नव्हती.
(फोटो ०५ दिंडोरी,१)
सर्व प्रशासकीय नियम पाळून मोजक्या सेवेकºयांच्या उपस्थितीत दिंडोरीत गुरु पौर्णिमा साजरी झाली. याप्रसंगी आरती व आॅनलाईन मार्गदर्शन करताना गुरु माऊली अण्णासाहेब मोरे.