पेठ तालुक्यातील गुरुजनांचे लाखमोलाचे दातृत्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:33+5:302021-06-09T04:18:33+5:30
पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन ...
पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजाराची वर्गणी गोळा करून तब्बल १५ लाखाचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यात उभा केला. तालुक्यातील वाडी-वस्तीवरील सामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व उपचाराच्या सुविधा असलेली फोर्स कंपनीची रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वाहन भांडार संकलनाच्या व फोर्स कंपनीच्या सहकार्याने शासनाच्या पोर्टलवरील रास्त दरात रुग्णवाहिका खरेदी करून आरोग्य विभागाच्या स्वाधीन केली.
पेठ पंचायत समिती आवारात विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, जि. प. सदस्य भास्कर गावीत यांच्याहस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी सभापती विलास अलबाड, पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, मनोज घोंगे, प्रांत अधिकारी डॉ. संदीप अहेर, तहसीलदार संदीप भोसले, कृषी अधिकारी अरविंद पगारे, गटविकास अधिकारी, नम्रता जगताप, अमित भुसावरे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे, गोकुळ झिरवाळ, नामदेव हलकंदर, गिरीश गावीत, शिक्षक संघटनेचे मनोहर टोपले, मोतिराम सहारे, रामदास शिंदे, राजेंद्र भोये, धनंजय चव्हाण, भारत भामरे, उत्तम चौधरी, संजय भोये, दिनकर डगळे, किरण नाठे, चंद्रशेखर पठाडे आदी उपस्थित होते.
चौकट===
जिल्हा परिषदेकडून गौरव
पेठसारख्या छोट्या व दुर्गम तालुक्यातील शिक्षकांनी १५ लाखाचा कोरोना निधी जमा करून रुग्णवाहिका भेट दिल्याने जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक समन्वय समितीचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, वैशाली वीर, नम्रता जगताप, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे, जी. पी. खैरनार, अंबादास पाटील आदी उपस्थित होते.
(फोटो ०७ झेडपी)