‘परीसस्पर्श’कडून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:33 AM2018-11-21T01:33:26+5:302018-11-21T01:33:40+5:30

तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून परीसस्पर्श अ‍ॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार समोर आला आहे़

Millions of fraud by 'Parispush' | ‘परीसस्पर्श’कडून लाखोंची फसवणूक

‘परीसस्पर्श’कडून लाखोंची फसवणूक

Next
ठळक मुद्देतीन वर्षांत दामदुप्पट : प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष

नाशिक : तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून परीसस्पर्श अ‍ॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार समोर आला आहे़ या फसवणुकीबाबत गुंतवणूकदारांनी अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची मंगळवारी (दि़२०) भेट घेऊन लेखी निवेदन दिले असून, फसवणूक करणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़
या कंपनीमध्ये जिल्ह्णातील हजारो कष्टकरी व मोलमजुरी करणाºया नागरिकांनी गुंतवणूक केली आहे, तर संचालक खोटी आश्वासने देऊन पैशांची अफरातफर करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़
या कंपनीबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याचे अत्याचार विरोधी कृती समितीने म्हटले आहे़ या निवेदनावर गंगा टोमके, शकुंतला तायडे, छाया पंडित, निर्मला अष्टेकर, सी़हिंगमिरे, रोहिणी केदारे, गीता लोहारकर, जयश्री नेमाडे, चंद्रभान तुपे, मंदा वाघ, प्रशांत भालेराव, संगीता बोराडे, मंगला जाधव, दगू राऊत व राजेंद्र काळे यांच्या सह्णा आहेत़ दरम्यान, परीसस्पर्श कंपनीने फसवणूक केलेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन उपायुक्त कोकाटे यांनी केले आहे़
रक्कम देण्यास टाळाटाळ
पोलीस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कंपनीचे चेअरमन, संचालक यांनी गुंतवणुकदारांना तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा तसेच अधिक गुंतवणूक देणाºयांना चारचाकी वाहने देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ २०१३ मध्ये गुंतवूणक केलेल्या गुंतवणूकदारांची मुदत पूर्ण झाली असून कंपनीचे चेअरमन व संचालक रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत़

Web Title: Millions of fraud by 'Parispush'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.