द्राक्ष उत्पादकांची लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:16+5:302021-06-19T04:11:16+5:30

पाच द्राक्ष उत्पादकांना एका निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रकमेस फसविले असून, याप्रकरणी दिंडोरी पोलीस ...

Millions of grape growers cheated | द्राक्ष उत्पादकांची लाखोंची फसवणूक

द्राक्ष उत्पादकांची लाखोंची फसवणूक

Next

पाच द्राक्ष उत्पादकांना एका निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रकमेस फसविले असून, याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच संशयित व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सदर व्यापाऱ्यांनी अनेक द्राक्ष उत्पादकांची आर्थिक फसवणूक केली असून, दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यातून सुमारे दोन ते तीन कोटींची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे फसवले गेलेले शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार, पोलीस अधीक्षक यांची भेट घेत निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर ४७ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

दिंडोरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्री सोल्युशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) या व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. यातील अमित देशमुख फरार असून, इतरांना पोलिसांनी अटक केली आहे.

इन्फो

अनेक शेतकऱ्यांची फसवणूक

संशयित व्यापाऱ्यांनी सुनील शिंदे, निगडोळ येथील अनिल मालसाने, नळवाडी येथील संजय वाघ, शरद मालसाने, वलखेड येथील रघुनाथ पाटील या शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी संशयितांनी अद्याप पैसे परत केले नाहीत. दरम्यान, फसवणूक झालेल्या इतर अनेक शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण अधिक तपास करत आहेत.

Web Title: Millions of grape growers cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.