अंबोली शिवारात परराज्यातील लाखोंचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:25 PM2018-12-28T17:25:30+5:302018-12-28T17:27:41+5:30

नाशिक : नाताळ तसेच थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्याची नाशिक जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर - जव्हार रोडवरील अंबोली शिवारातून शुक्रवारी (दि़२८) अटक केली़ त्यांच्याकडून बोलरो पिकअप वाहन व मद्यसाठा असा ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ संजयभाई सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहू अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़

 Millions of liquor bottles of the state seized in Amboli Shivar | अंबोली शिवारात परराज्यातील लाखोंचा मद्यसाठा जप्त

अंबोली शिवारात परराज्यातील लाखोंचा मद्यसाठा जप्त

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क : विभागीय भरारी पथकाची कामगिरी बोलरो वाहनासह मद्यसाठ्याचा समावेश

नाशिक : नाताळ तसेच थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्याची नाशिक जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर - जव्हार रोडवरील अंबोली शिवारातून शुक्रवारी (दि़२८) अटक केली़ त्यांच्याकडून बोलरो पिकअप वाहन व मद्यसाठा असा ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ संजयभाई सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहू अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़

केवळ दादरा नगर हवेली राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करून ती नाशिक जिल्ह्यात आणली जात असल्याची माहिती विभागीय भरारी पथकास मिळाली होती़ उप आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबक-जव्हार रोडवर शुक्रवारी सापळा लावून वाहन तपासणी केली जात होती़ यामध्ये नंबरप्लेट नसलेल्या पांढºया रंगाच्या बोलेरो पिकअप मध्ये दादरा नगरहवेलीमध्ये विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला़ त्यामध्ये रॉयल स्पेशल ओल्ड व्हिस्की ३५ बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्की ९ बॉक्स, किंगफिशर बिअर १५ बॉक्स, टुबर्ग बिअर (१० बॉक्स) व ४० प्लास्टीकचे रिकामे कॅरेट होते़ ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा व सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

या प्रकरणी संशयित गांधी व साहू या दोघांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़ निरीक्षक एम़बी़चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस़एस़रावते, देवदत्त पोटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, अमन तडवी, विठ्ठल हाके, धनराज पवार,रतिलाल पाटील, सोमनाथ भांगरे यांनी ही कारवाई केली़

Web Title:  Millions of liquor bottles of the state seized in Amboli Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.