लाखो लिटर पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:51 AM2018-03-03T00:51:35+5:302018-03-03T00:51:35+5:30

भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर व अण्णा भाऊ साठेनगर यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रास चोरी सुरू असतानासुद्धा कारवाई गुलदस्त्यातच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा लाखो रु पयांचा महसूल बुडत आहे.

 Millions of liters of water theft | लाखो लिटर पाण्याची चोरी

लाखो लिटर पाण्याची चोरी

Next

संजय शहाणे ।
इंदिरानगर : भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर व अण्णा भाऊ साठेनगर यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रास चोरी सुरू असतानासुद्धा कारवाई गुलदस्त्यातच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा लाखो रु पयांचा महसूल बुडत आहे. भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, सादिकनगर, अण्णा भाऊ साठेनगर आदी परिसर हातावर काम करणाºयांची लोकवस्ती म्हणून ओळख आहे तर काहींनी गुंठे वार पद्धतीने जागा घेऊन घरे बांधली आहेत. हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असून, त्यापैकी बहुतेकांनी अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांपासून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेताना त्यांना कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी येत नाही. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची सर्रासपणे चोरी होत असून, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल लाखो रु पयांनी बुडत आहे. महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी ४५ दिवसांची अभय योजना राबवली होती. मात्र या योजनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे सदर योजनेंतर्गत नागरिकांना अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी शेवटची संधी म्हणून २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही अद्यापपर्यंत परिसरातील अनधिकृत नळजोडणी अधिकृत करून घेण्यासाठी नागरिकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे. शेकडोच्या संख्येने असलेल्या अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई केव्हा होणार आणि लाखो लिटर पाण्याची व पाणीपट्टी महसुलाची बचत केव्हा होणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
विद्युत मोटार लावून पाणी उपसा
पांडवनगरी परिसरात सुमारे अडीच हजार सदनिका असून, यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तीन मजली अपार्टमेंट असल्याने आणि कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असल्याने पाणी पुरत नाही. त्यामुळे काही नागरिकांनी एकाच घरात दोन नळजोडणी करून घेतली आहे. त्यामुळे परिसरात नळजोडणीची संख्या दिवसगणिक वाढत असून त्यामुळे लाखो रु पयांचा पाणीपट्टी महसूल बुडत आहे. अनधिकृत नळजोडणी त्यात काहींनी तर विद्युत मोटारी लावून जणू काही पाणी घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे. पोलीस बंदोबस्ताअभावी मनपा कर्मचारी अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई करण्यास धजत नसल्याचे समजते. वडाळागावातील काही गोठेधारकांनी तर जलवाहिनीस विद्युत मोटार लावून सर्रासपणे पाण्याची चोरी सुरू ठेवली आहे.

Web Title:  Millions of liters of water theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.