बागलाण तालुक्यात वादळी पावसामुळे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:23+5:302021-06-01T04:11:23+5:30
वायगाव येथे आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. सटाणा ...
वायगाव येथे आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. सटाणा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे वादळी वाऱ्यासोबत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे राहते घर, फळबागा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार दिलीप बोरसे व भाजप किसान मोर्चाचे बिंदू शेठ शर्मा यांनी सरसकट योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कृषी सहायक, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वायगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले.
गारपिटीमुळे डाळिंबबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फोटो- ३१ सटाणा रेन
वायगाव येथे वादळी पावसामुळे घराचे उडालेले छप्पर
===Photopath===
310521\31nsk_32_31052021_13.jpg
===Caption===
फोटो- ३१ सटाणा रेनवायगाव येथे वादळी पावसामुळे घराचे उडालेले छप्पर