लाखोंचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:24 AM2017-09-22T00:24:38+5:302017-09-22T00:24:52+5:30
शहरातील विविध भागांमध्ये घरफोड्या करणाºया एका संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण ४ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये घरफोड्या करणाºया एका संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण ४ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या पथकाने सापळा रचला. चुंचाळे शिवारातील दत्तनगर परिसरातील कारगिल चौकात लावलेल्या सापळ्यात संशयित घरफोड्या नीलेश उत्तम वायाळ (२०) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने तीन साथीदारांच्या मदतीने इंदिरानगर, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोळा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल हॅन्डसेट, एक एलसीडी टीव्ही, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, डिजीटल फोटो फ्रेम, एम्प्लीफायर, दोन चोरीच्या दुचाकी असा सुमारे चार लाख ३५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.