लाखो रुपयांचे रखडले मेडीक्लेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:51 AM2017-12-25T00:51:41+5:302017-12-25T00:54:10+5:30

संजय पाठक । नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्याने लाखो रुपयांचा परतावा मिळण्यात अडचण झाली आहे. डॉक्टरांच्या विनवणीनंतरही पालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तोडगा न निघाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

Millions of Rupees Mediclaim | लाखो रुपयांचे रखडले मेडीक्लेम

लाखो रुपयांचे रखडले मेडीक्लेम

Next
ठळक मुद्देचौदाशे रुग्णालये नोंदणीविना : मनपा-डॉक्टरांच्या वादात रुग्णांचे हालफटका शहरातील हजारो नागरिकांना बसला

संजय पाठक ।
नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्याने लाखो रुपयांचा परतावा मिळण्यात अडचण झाली आहे. डॉक्टरांच्या विनवणीनंतरही पालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तोडगा न निघाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
नाशिक शहरात सुमारे पंधराशे खासगी रुग्णालये आहेत. त्यात दररोज हजारो रुग्ण उपचार घेत असतात. उपचारासाठी एकूणच होणारा खर्च लक्षात घेता आता बहुतांशी नागरिकांचा मेडीक्लेम (आरोग्य विमा) काढलेला असतो. साहजिकच उपचार घेताना रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मेडीक्लेमच्या मिळणाºया रकमेवरूनच नियोजन करतात. काही प्रकरणात क्लेम थेट रुग्णालयांना मिळतो किंवा काही प्रकरणात रुग्णांना मिळत असतो. शासकीय कर्मचाºयांच्या बाबतीत हा खर्च बिले सादर केल्यानंतर परताव्याच्या स्वरूपात मिळत असतो. सामान्यत: मेडीक्लेमचे अर्ज भरत असताना त्यात संबंधित रुग्णालयाचा महापालिकेतील नोंदणी क्रमांक आवश्यक असतो. त्याशिवाय क्लेम सेटल होत नाही आणि रक्कम मिळत नाही.
नाशिक महापालिका आणि शहरातील हॉस्पिटल यांच्यातील नव्या नियमावरून नोंदणीचा निर्माण झालेला प्रश्न हा पाच वर्षांपूर्वीचा असून, तो अद्याप सुटलेला नाही. मेडीक्लेमचे अर्ज भरताना यापूर्वी हॉस्पिटलच्या नूतनीकरण केलेल्या नोंदणीचा क्रमांक नसला तरी नोंदणी क्रमांकासाठी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे मेडीक्लेम मिळत होते. गेल्या महिन्यात इन्शुरन्स रेग्युलटरी अ‍ॅँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने एक आदेश संकेतस्थळावर जारी केला आहे. त्यासाठी मेडीक्लेमसाठी मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टनुसार स्थानिक प्राधिकरणाकडे रुग्णालयाची नोंदणी आवश्यक केली आहे. नाशिक महापालिका आणि शहरातील हॉस्पिटल यांच्यातील नव्या नियमावरून नोंदणीचा निर्माण झालेला प्रश्न हा पाच वर्षांपूर्वीचा असून, तो अद्याप सुटलेला नाही. काय आहे अडचणकेंद्र आणि राज्य सरकारने रुग्णालयांसाठी अग्निशमन सुरक्षा नियमावली केली आहे. रुग्णालयांची नोंदणी महापालिकेकडे करताना किंवा नोंदणीचे नूतनीकरण करताना वैद्यकीय विभागाला अग्निशमक दलाच्या ना हरकत दाखल्याची प्रत द्यावी लागते. परंतु अग्निशमन सुरक्षिततेचे नियम जाचक असून, सदरचे नियम लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना सुरक्षा व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडून नोंदणीचे नूतनीकरण केले जात असून, त्याचा फटका रुग्णालयांना पर्यायाने रुग्णांनाही बसत आहे.

Web Title: Millions of Rupees Mediclaim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर