सटाण्यात लाखोंचा दगड उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:57 PM2018-11-29T22:57:19+5:302018-11-29T22:57:59+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यात अवैध वाळू उपशाविरु द्ध महसूल यंत्रणेची धडक मोहीम सुरू असताना आदिवासी पश्चिम पट्ट्यात तलाठ्याला हाताशी धरून बेकायदेशीरपणे खदान तयार करून दररोज लाखो रु पयांचा दगड उपसा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

Millions of stones in the stove | सटाण्यात लाखोंचा दगड उपसा

सटाण्यात लाखोंचा दगड उपसा

Next
ठळक मुद्देबेकायदेशीर खदान : यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी

सटाणा : बागलाण तालुक्यात अवैध वाळू उपशाविरु द्ध महसूल यंत्रणेची धडक मोहीम सुरू असताना आदिवासी पश्चिम पट्ट्यात तलाठ्याला हाताशी धरून बेकायदेशीरपणे खदान तयार करून दररोज लाखो रु पयांचा दगड उपसा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे, तताणी दरम्यान साकोडेनजीक रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी तयार करण्यासाठी तहसीलकडे रीतसर रॉयल्टी भरून अधिकृत खदानमधून दगड उपशाची परवानगी घेणे बंधनकारक असताना ठेकेदार, तलाठी आणि वनकर्मचारी यांनी परस्पर रस्त्याच्या कडेला ब्लास्टिंग लावून अवैध खदान तयार केले आहे. ब्लास्टिंग लावून दररोज सत्तर ते ऐंशी ट्रॅक्टर दगड उपसला जात आहे. महसूल विभागाने तत्काळ बेकायदा खदान बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.धोकादायक खदान
बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेले खदान वाहनांसाठी अक्षरश: धोकादायक बनले आहे. साकोडेपासून पाचशे मीटर असलेले खदान वळण रस्त्याच्या कडेला तयार करण्यात आले आहे. यामुळे रस्ता खचून तसेच वळणावर असल्यामुळे रात्री-पहाटे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने याची चौकशी करून सुरक्षेच्या दृष्टीने हे बेकायदा खदान बुजण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.राखीव वनक्षेत्राला धोका साकोडे परिसरात राखीव वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिसवच्या झाडांचे वनक्षेत्र आहे असे असताना जंगलाला लागून बेकायदेशीर खदान तयार करून दगड उपसा केला जात आहे. तसेच ब्लास्टिंगला वनक्षेत्रात बंदी असताना राजरोज सुरु ंगाचे स्फोट केले जात आहेत. यामुळे वनक्षेत्र धोक्यात येऊन पर्यावरणचा ºहास होण्याची भीती निसर्गप्रेमींकडून होत आहे. दरम्यान या भागात बहुतांश ठिकाणी मुरूम चोरीदेखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे.


 

Web Title: Millions of stones in the stove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.