गणेशोत्सवात कळवणमध्ये लाखोची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 06:39 PM2018-09-24T18:39:45+5:302018-09-24T18:44:17+5:30
कळवण : गणेशोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याने खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही. मंडप, देखावा, मिरवणूक, विद्युत व्यवस्था यावर एका मंडळाचा दहा दिवसांचा खर्च लाखोंच्या घरात गेला. गणपती बाप्पाचे आगमन ते विसर्जन दरम्यान श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्यापासून सजावटीच्या वस्तू, विविधांगी देखावे, मखर, फुलमाळा तोरण, मंडप , ढोलताशे, डीजे, फटाके, ट्रॅक्टर, पेहराव, पूजा, पुरोहित, भजनी मंडळ आदीसह आवश्यक वस्तूच्या खरेदी व विक्र ी यामुळेच गणेशोत्सवात केवळ कळवण शहर व तालुक्यात या वर्षी कोट्यवधींची उलाढाल झाली.

गणेशोत्सवात शहर व तालुक्यात २१४ गणेश मंडळानी व घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली होती. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी आरासावर जास्त खर्च केला. गणेशोत्सव कालावधीत लाखोची उलाढाल झाली. घरोघरी सजावटीसाठी महाग वस्तूंच्या खरेदीकडे दुर्लक्ष करीत इको फ्रेंडली सजावटीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी लाकूड, बांबू, कापडी फुलांचा वापर करून मंडपाची सजावट करीत गेली. यंदा कापडी आणि कागदी फुलांची विक्र ी मोठ्या प्रमाणात झाली. थर्माको वापरावर बंदी असल्याने कमी खर्चात आकर्षक सजावट व्हावी, या उद्देशाने कापडी फुलांचा जास्त वापर केला गेला. यंदाच्या गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या सजावट साहित्याच्या विक्र ीला मोठा फटका बसला आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गुलाब, झेंडू, शेवंती आणि सजावटीच्या फुलांना सर्वाधिक मागणी होती. या फुलांची मागणी पाहता ११ दिवसांत कळवण व अभोणा, कनाशी, सप्तशृंग गडावर लाखोच्या फुलांची उलाढाल झाली. भाविकांकडून मागणी वाढल्यामुळे फुलांच्या बाजाराला तेजी आली होती.
गणेशोत्सवात सर्वांधीक मोठी उलाढाल मंडप व्यवसायात झाली असून मंडपाचा दहा दिवसांचा किमान कमीत कमी तीस हजार रु पये खर्च झाला. मात्र मोठ्या मंडळांचे मंडप मोठे असल्याने खर्च देखील अधिक प्रमाणात झाला. भव्य स्वागत कमान उभारणीसह विद्युत रोषणाई करण्याचा खर्च लाखोच्या घरात गेला असून अनेक मंडळानी विसर्जन मिरवणूक अधिकाधिक भव्य आणि आकर्षक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डीजे व ढोलताशे, फटाके यांचा खर्च हजारोंबरोबरच लाखांपर्यत केला गेला. गणेश मूर्ती नेण्यात येणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉलीवरील सजावटीकडे अधिकाधिक लक्ष दिले गेले. मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी असल्याने शासन निर्णयानुसार आवाज मर्यादा ठेवून डीजेवर लाखोंचा खर्च करण्यात आला. ढोल-ताश्या पथकातील सदस्यांची संख्या, ढोलची संख्या आणि वेळ यावर त्या पथकाचे मानधन अवलंबून असल्यामुळे मानधनही त्याच तुलनेत मोजण्यात आल्याने लाखो रु पयांचे देण्यात आल्याने एकूणच कोट्यवधी रु पयांची उलाढाल झाली. त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांबरोबरच लहान व्यावसाविकांना यंदाचा गणेशोत्सव समाधान देणारा ठरला.