गिरणा, पुनंद नदीवर बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:32+5:302021-09-22T04:16:32+5:30
कळवण : गिरणा आणि पुनंद नदीवर गेटेड बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार असून, आवर्तन हे कायम राहणार ...
कळवण : गिरणा आणि पुनंद नदीवर गेटेड बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार असून, आवर्तन हे कायम राहणार आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांना भीक घालू नका, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी गोसराणे, बार्डे, पाळे बु., पाळे खुर्द, एकलहरे येथे आयोजित गाव संवाद दौऱ्यात नागरिकांना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय पवार, देविदास पवार, कौतिक पगार, महेंद्र हिरे, राजेंद्र भामरे, हेमंत पाटील, संतोष देशमुख उपस्थित होते. आमदार पवार पुढे म्हणाले की, चणकापूर धरण वा गिरणा नदीपात्र कोरडेठाक होईल, अशा विरोधकांच्या अफवांना भीक घालू नका. सन २०१४ ते २०१९ या काळात चणकापूर धरण कोरडे ठाक केले, चणकापूर धरणाचे आवर्तन ९० दिवसांचे केले. त्यावेळी गिरणा काठचे तथाकथित नेते मूग गिळून बसले होते. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांचे हित जोपासता आले नाही. आता शेतकरी हिताच्या गप्पा मारून विरोधाला विरोध करून विकासकामांना खीळ घातली जात आहे. चणकापूरचे आवर्तन ९० दिवसांवरून ४५ दिवसांवर केले असून, हे आवर्तन कायम राहील, असा विश्वास आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना दिला. चणकापूरमधील २८७ दशलक्ष घनफूट गाळ काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होणार असल्याचे यावेळी आमदार नितीन पवार यांनी सांगितले.
यावेळी रामदास पाटील, बापू पाटील, भगवान पाटील, भाई दादाजी पाटील, विश्वास मोरे, पंडित वाघ, आबा वाघ, गिरीश देवरे, उत्तम पाटील, बाळू पाटील, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, मनोज कामळस्कर, कळमथे येथील बाळासाहेब शिरसाठ दत्तात्रेय शिरसाठ, प्रकाश वाघ, केशव वाघ, देविदास पवार, नारायण वाघ, विजय वाघ, अरुण वार्डे, अरुण शिरसाठ राजेंद्र देशमुख, अविनाश देशमुख, दिलीप डेर्ले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
------------------------
पाळे खुर्द येथील संवाद सभेत भाग घेताना आमदार नितीन पवार व मान्यवर. (२१ कळवण पवार)
210921\21nsk_16_21092021_13.jpg
२१ कळवण पवार