मनपात सारे कसे शांत शांत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:14 AM2018-11-27T01:14:07+5:302018-11-27T01:14:25+5:30
दररोजच्या बैठका, नवे आदेश, कोणावर कारवाई तर महत्त्वाचा विषय फेटाळला म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड तर कधी संघटनांच्या तक्रारी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेत काही वादग्रस्त- चर्चेत राहणारे घडले नाही असा दिवस विरळाच, परंतु तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतरच पहिला कामकाजाचा दिवस मात्र शांत होता. महापालिकेत सायंकाळी नगरसेवकांचा किंवा अन्य कोणाचा फार वावर नव्हताच, शिवाय चर्चा फक्त मुंढे यांची बदली आणि नूतन आयुक्त कोण या विषयाचीच राहिली.
नाशिक : दररोजच्या बैठका, नवे आदेश, कोणावर कारवाई तर महत्त्वाचा विषय फेटाळला म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड तर कधी संघटनांच्या तक्रारी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेत काही वादग्रस्त- चर्चेत राहणारे घडले नाही असा दिवस विरळाच, परंतु तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतरच पहिला कामकाजाचा दिवस मात्र शांत होता. महापालिकेत सायंकाळी नगरसेवकांचा किंवा अन्य कोणाचा फार वावर नव्हताच, शिवाय चर्चा फक्त मुंढे यांची बदली आणि नूतन आयुक्त कोण या विषयाचीच राहिली.
महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची ८ फेबु्रवारी रोजी नियुक्ती झाली. पहिल्या दिवशी त्यांनी ठीक दहा वाजता पाऊल ठेवले आणि सर्व विभागांना भेटी देत तसेच बैठक घेत दिवस गाजवायला सुरुवात केली तो त्यांची बदली होईपर्यंत मुंढे यांची कारकीर्द गाजली. गुरुवारी (दि.२२) त्यांची बदली होईपर्यंत हीच चर्चा गाजत होती. मात्र मुंढे यांची बदली झाल्यानंतर सोमवारी (दि.२६) मुंढे यांच्याशिवाय महापालिकेतील वातावरण शांत होते. विशेष म्हणजे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक हजेरी लावतील आणि वातावरण गजबजून जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात असे फार काही घडले नाही. प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार असलेल्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी होणारी खाते प्रमुखांची साप्ताहिक बैठक अत्यंत गांभीर्याने घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. सर्व कामे सुरळीत ठेवण्याच्याही त्यांनी सूचना केल्या.
मुंढे यांची शिस्त पाळा
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाºयांना कार्यप्रवण राहण्याच्या सूचना केल्या. तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर कामकाज विस्कळीत होऊ नये यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या आणि कार्यालयीन शिस्त पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या.