ओझर टाऊनशिप येथे मिनी मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:24 PM2020-12-14T23:24:00+5:302020-12-15T01:11:00+5:30
ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली. एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने एचएएल स्टेडियम येथे मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ एचएएलचे महाव्यवस्थापक दीपक सिंगल यांच्या हस्ते मशाल तिकोने या खेळाडूच्या हाती देऊन करण्यात आला.
ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली.
एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने एचएएल स्टेडियम येथे मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ एचएएलचे महाव्यवस्थापक दीपक सिंगल यांच्या हस्ते मशाल तिकोने या खेळाडूच्या हाती देऊन करण्यात आला.
यावेळी महाव्यवस्थापक आर. पी. खपली, साकेत चतुर्वेदी, मानव संसाधन विभागाचे प्रमुख अनिल वैद्य, कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे आदी उपस्थित होते. त्यानंतर मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले एचएएलमधील खेळाडू व कामगार स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हातात विविध फलक हातात घेऊन टाऊनशिप परिसरातील मुख्य रस्त्यावर धावले.
मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी मानव संसाधन विभाग, जितेंद्र मोरे, किशोर कुलकर्णी, प्रशांत कुंभारे, नितीन पगारे, सुरेश पाटील, राजेंद्र मोरे, मन्सूर शेख, एचएईडब्लूआरसी संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.