मिनी मंत्रालयाचा प्रवास स्वच्छतेतून समृद्धीकडे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:35 AM2017-10-19T00:35:22+5:302017-10-19T00:35:35+5:30
लेखा वर्गीकरण पूर्ण : दर तिमाहीला स्वच्छता मोहीम नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नाशिक जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने प्रत्येक विभागाची स्वच्छता व लेखा वर्गीकरण मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांची स्वच्छता मोहीम पूर्ण झाली असून, आतापर्यंतचे नस्त्यांचे लेखा वर्गीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लेखा वर्गीकरण पूर्ण : दर तिमाहीला स्वच्छता मोहीम
नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नाशिक जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने प्रत्येक विभागाची स्वच्छता व लेखा वर्गीकरण मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांची स्वच्छता मोहीम पूर्ण झाली असून, आतापर्यंतचे नस्त्यांचे लेखा वर्गीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दोेन आठवड्यांपूर्वी नाशिक जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अचानक भेट देऊन पदाधिकाºयांच्या कक्षासह आरोग्य व बांधकाम विभागाला धावती भेट दिली होती. त्यावेळी बांधकाम विभागातील लाल कपड्यात बांधलेल्या नस्त्यांचे ढिगारे पाहून ‘हे लग्नाचे बस्ते बांधणे आवरा’ असा टोमणा मारत येत्या महिन्याभरात सर्वच विभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून नस्त्यांचे वर्गीकरण करण्याबरोबरच इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटी करण्याचे आदेश प्रशासनाला व पदाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी सर्वच विभागांना भेटी देऊन खातेप्रमुखांना नस्त्यांचे वर्गीकरण करण्याबरोबरच अनावश्यक साहित्य तत्काळ दूर करण्याचे आदेश दिले होते. तसेच इमारतीला तात्काळ रंगरंगोटी करून आवश्यक तेथे दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्वच विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील नस्त्यांचे लेखा वर्गीकरण करण्याबरोबरच अनावश्यक साहित्य व रद्दी कापडात बांधून एका ठिकाणी ठेवले होते. तसेच मुख्यालयाच्या इमारतीतील गटनेत्यांसाठी देण्यात आलेल्या कक्षाला स्वतंत्र अभिलेखा कक्ष तयार करून त्यात या अभिलेखा वर्गीकरण करण्यात आलेल्या नस्त्या व अन्य कामकाजाचे साहित्य ठेवण्यात आले आहे.