ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:08 PM2020-05-04T22:08:51+5:302020-05-04T22:55:47+5:30

नाशिक : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे.

 Minimum salary for Gram Panchayat employees | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन

googlenewsNext

नाशिक : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाºयांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडित वेतन न देता किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश काढण्यात निर्णय आला असून, त्याचा जिल्ह्यातील २९०० कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी राज्यात आपत्ती, पूरपरिस्थिती अशी संकटे उद्भवली होती. तसेच सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये सर्व प्रकारची करवसुली कमी झालेली आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाºयांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गावागावांमध्ये आदर्श असे काम केले आहे. वेतनाच्या सध्या प्रचलित पद्धतीनुसार त्यांचे वेतन करवसुलीच्या टक्केवारीशी जोडण्यात येते. सध्या ही पद्धती अवलंबल्यास त्यांना अत्यल्प वेतन मिळेल, जे की अन्यायकारक ठरेल. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाºयांना चालू आर्थिक वर्षात सध्या करवसुलीच्या टक्केवारीच्या आधारे वेतन न देता त्यांना निर्धारित किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
---------
ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च ग्रामपंचायत आणि राज्य शासनामार्फत करण्यात येतो. ग्रामपंचायत कर्मचाºयांना किमान वेतन देण्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या हिश्श्यामधून अधिकचा खर्च भागविण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

Web Title:  Minimum salary for Gram Panchayat employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक