कृषी संशोधन केंद्राला मंत्री खोत यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:56 PM2017-08-24T23:56:13+5:302017-08-25T00:02:39+5:30
शेतीतील संकरित वाण व नवीन तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहचणे काळाची गरज असून, शेतकºयांनी नवीन सुधारित संशोधन केलेले बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान व विकास प्रतिष्ठान या कृषी संशोधन केंद्राला गुरुवारी (दि.२४) रोजी भेटी दिल्यानंतर ते बोलत होते.
सायखेडा : शेतीतील संकरित वाण व नवीन तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहचणे काळाची गरज असून, शेतकºयांनी नवीन सुधारित संशोधन केलेले बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान व विकास प्रतिष्ठान या कृषी संशोधन केंद्राला गुरुवारी (दि.२४) रोजी भेटी दिल्यानंतर ते बोलत होते.
या भेटीत त्यांनी संशोधन व कार्या विषयी माहिती जाणून घेतली. केंद्राचे निदेशक एच. पी. शर्मा यांनी बागवाणी येथील संशोधनाबद्दल माहिती देतांना आतापर्यंत येथे कांद्याच्या नऊ व लसणाच्या दहा जाती विकिसत केल्या असल्याचे सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी बागवानी संशोधन केंद्रातील संशोधन व लॅबची पाहणी केली. बागवानीने विकिसत केलेल्या कांदा व लसूण या वाणांची पाहणी केली. यावेळी पाशा पटेल, आमदार अनिल कदम, तहसीलदार विनोद भामरे उपस्थित होते.