खंडेराव महाराज देवस्थानच्या विकासासाठी मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:24+5:302021-06-06T04:11:24+5:30
देवस्थानाला तीर्थस्थळ विकासाचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरत असून, वर्षभरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे ...
देवस्थानाला तीर्थस्थळ विकासाचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरत असून, वर्षभरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे मूलभूत सुविधांचा विकास करण्याची मागणी मुरकुटे यांनी केली आहे. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, आसनव्यवस्था, करणे, स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी, सौर पॅनल युनिट करावे, यात्रेकरूंकरिता १२ युनिट शौचालय करणे, मंदिरापासून पाउतका व बारागाड्या मार्ग व रस्ता काँक्रिटीकरण, पदमार्ग व बंदिस्त गटार करणे, वीज व्यवस्था, वाहनतळ काँक्रिटीकरण करणे आदी कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. मुश्रीफ यांना निवेदन दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी सांगितले.
फोटो - ०५ मनेगाव खंडेराव
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे.
===Photopath===
050621\05nsk_7_05062021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ मनेगाव खंडेराव