पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्येच तळ ठोकून
By Sandeep.bhalerao | Published: January 10, 2024 04:12 PM2024-01-10T16:12:22+5:302024-01-10T16:13:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येत आहेत.
संदीप भालेराव, नाशिक: राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू झाली आहे. मोदी यांच्या दौऱ्याची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली असल्याने महाजन यांनी नाशिकमध्येच तळ ठोकला आहे.
मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने संपुर्ण यंत्रणा कामाला लागली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने महाजन यांच्यावर नाशिकची जबाबदारी असल्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सुचना दिल्या जात आहेत. याशिवाय महसूल, पोलीस तसेच क्रीडा विभागाबरोबरच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील समन्वय साधला जात आहे.
सभास्थळाची व्यवस्था करण्यापासून ते रोड-शो तसेच इतर अनेक कामकाजाची पाहाणी करण्यासाठी महाजन यांची धावपळ सुरू आहे. मंत्रालयातील बैठका, नियोजन समितीची बैठक तसेच अधिाकऱ्यांबारेबरच व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून महाजन हे नाशिकमधूनच संवाद साधत आहेत.
पालकमंत्री दादा भूसे तसेच गिरीश महाजन या दोघांसाठी नाशिक जिल्ह्यातील पंतप्रधान मोदी यांचा दौरा महत्वपुर्ण असल्याने हे दोन्ही मंत्री रात्री उशीरापर्यंत शहरातील कामांची पाहाणी करीत आहेत.