राज्यमंत्री भारती पवार यांचा येवलेकरांकडून दिल्लीत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:27+5:302021-07-14T04:17:27+5:30
डॉ. भारती पवार यांच्यानिमित्ताने ५९ वर्षांनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला आहे. ...
डॉ. भारती पवार यांच्यानिमित्ताने ५९ वर्षांनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला आहे. या मंत्रिपदाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे विणकारांच्या समस्यांसह येवला तालुक्याच्या विकासकामांनाही गती मिळेल, असा विश्वास जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. जनतेने पहिली महिला खासदार म्हणून मला संसदेत पाठविले. सासरे कै. ए. टी. पवार यांच्याकडून मला जनतेच्या कामांची शिकवण मिळाली. त्याचा उपयोग भविष्यात होणार आहे. देशातील शेतकरी, आदिवासी, महिलांसह ग्रामीण-शहरी जनतेची कामे करण्यास प्राधान्य राहील, असे डॉ. पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे श्रावण जावळे, माजी नगरसेवक संजय कुक्कर, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, दिनेश परदेशी, मीननाथ पवार, श्रीकांत खंदारे, युवराज पाटोळे, धिरज परदेशी, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन धसे, संतोष काटे, भूषण भावसार, मच्छिंद्र पवार, मयूर कायस्थ, नीलेश परदेशी, अण्णा पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - १३ येवला १
दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा येवलावासीयांकडून करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी श्रावण जावळे, संजय कुक्कर, डॉ. नंदकिशोर शिंदे, दिनेश परदेशी, मीननाथ पवार.
130721\13nsk_37_13072021_13.jpg
श्रावण जावळे, माजी नगरसेवक संजय कुक्कर, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, दिनेश परदेशी, मिननाथ पवार,