पदाधिकाऱ्यांचे संरक्षण राज्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:26 AM2018-08-27T01:26:57+5:302018-08-27T01:27:50+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले.
सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले. बाजार समितीमध्ये बागलाण व साक्री (जि. धुळे) तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यांच्या सोयीसुविधांसाठी बाजार समिती आवारात शेतकरी निवारा शेड व पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरेशन प्लांट या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार निधीतून दहा लक्ष रु पये मिळावे अशी मागणी जलसंघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सोनवणे व बाजार समितीचे उपसभापती सरदारसिंग जाधव यांनी यावेळी केली. बाजार समितीतर्फेडॉ. भामरे यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. दरम्यान, डॉ. भामरे यांनी आवारातील कै. दगाजी अजबा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संचालक केशव मांडवडे, श्रीधर कोठावदे, जयप्रकाश सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, राजेंद्र पाटील, नरेंद्र अहिरे, संजय देवरे, साहेबराव सोनवणे, भिकानाना सोनवणे, प्रभाकर रौंदळ, संजय बिरारी, अनिल माळी, संदीप साळे, शरद सोनवणे, महादू मोरे, ज्ञानेश्वर देवरे, मुन्ना सूर्यवंशी, कुणाल सोनवणे, जे. टी. सूर्यवंशी, जीवन सोनवणे आदींसह शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील शेतकºयांबरोबरच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील असून, कोणत्याही कामासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.