ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:36 PM2019-02-04T17:36:49+5:302019-02-04T17:37:34+5:30

ग्रामविकासाची कामे ग्रामस्थ सुचवतील ती प्राधान्याने करावीत. कंत्राटदारांशी संगनमत करुन त्यांनी सुचविलेली कामे करु नका अशी तंबी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी वडनेर व वडेल येथे आले असता ते बोलत होते. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुजाणपणे नागरिकांनीच पुढाकार घ्यावा. गाळपेऱ्याच्या माध्यमातुन, चा-याच्या प्रश्नाची काहीअंशी सोडवणूक होऊ शकेल असेही भुसे यांनी सांगितले.

 Minister of State for Rural Development reviewed the drought situation | ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

googlenewsNext

अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीसाठी संपादीत केलेली शेती महामंडळाची साडेआठशे एकर जमीन तसेच काष्टी शिवारातील शेती महामंडळाची हजार एकर जमीन हे मालेगाव तालुक्याला वरदान ठरणारे दोन महत्वकांक्षी प्रकल्प असून चाळीसगाव फाट्यावरील औद्योगिक वसाहतीनंतर अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीत बेरोजगार तरुणांना काम मिळणार आहे. रोजगार निर्मितीमुळे या भागाचा नक्कीच कायापालट होईल असा आशावादही यावेळी भुसे यांनी व्यक्त केला. वडनेर, खाकुर्डी, अजंग व वडेल ग्रामपंचायतीमार्फत भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भुसे यांच्या सोबत गटविकास अधिकारी पिंगळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी, वीज मंडळ, महसुल विभाग, पाणलोट विभाग, ग्रामविकास अधिकारी आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी वडनेर, खाकुर्डी, कोठरे, विराणे, चिंचवे, वळवाडे,  अजंग, वडेल, पिंपळगाव, टिपे, संतनगर, डाबली आदि गावातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी संबंधित अधिका-यांकडून उत्तरे मिळवून दिली.

Web Title:  Minister of State for Rural Development reviewed the drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.